जनसंपर्क से जन समर्थन मोदी @९ महा जनसंपर्क अभियानांतर्गत उत्तर जिल्ह्यात प्रवास
चिपळूण | वार्ताहर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय क्षेत्र आणि सामान्य जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजनेसह अनेक आरोग्य क्षेत्रातील विविध योजना सुरू केल्या असून तो गोरगरिबांसह सर्वसामान्यांसाठी आधार ठरत असल्याचे मत भाजपा वैद्यकीय आघाडी डेंटल विंग प्रदेश संयोजक व रत्नागिरी उत्तर प्रवासी योजना प्रभारी डॉ. गोविंद भताने यांनी मांडले. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टरांच्या बैठकीत त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला.
मोदी @९ जनसंपर्क से जनसमर्थन अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. अजित गोपछडे प्रदेश भाजप महाराष्ट्र व प्रदेश संयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी यांच्या सूचनेनुसार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात महा-जनसंपर्क अभियान रत्नागिरी उत्तर जिल्ह्यात संपन्न झाले. या अभियानांतर्गत रत्नागिरी उत्तर वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. मनोज रावराणे यांच्या भेटीने सुरुवात झाली. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या भेटी, मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षाच्या काळातील विविध योजना व विकास कामाची माहिती सर्वांना देण्यात आली. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टरांची बैठक यावेळी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपस्थित डॉक्टरांनी भाजपा वैद्यकीय आघाडी डेंटल विंग प्रदेश संयोजक व रत्नागिरी उत्तर प्रवासी योजना प्रभारी डॉ. गोविंद भताने यांच्या सोबत संवाद साधला व मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकासाच्या मुद्यावर चर्चा केली. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध योजनांची माहिती देण्यात आली. या बैठकीला मेडिकल, डेंटल, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, फार्मसी या सर्व पॅथीचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित डॉक्टरांना सांगून सरल अॅपचे डाउनलोड करून घेण्यात आले व संपर्क से समर्थन अंतर्गत ९०९०९०२०२४ या क्रमांकावर प्रधानमंत्री मोदी यांना समर्थन देण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडी होमिओपॅथी विंग प्रदेश सहसंयोजक डॉ. अभय वणवे, डॉ. सचिन उत्पात, डॉ. विकास कस्तुरे, डॉ. दत्तात्रय यालागी, डॉ. अमित पाटील, डॉ. श्रेयस जोशी, डॉ. शरयू फुले, डॉ. प्रदीप इंगळे, डॉ. वृषाली स्वामी, डॉ. योगेश बोरसे, डॉ. सुरज शिरसाठ, डॉ. अमोल बेलवलकर यांच्यासह उत्तर रत्नागिरी कार्याध्यक्ष केदार साठे, सौ. सुरेखा खेराडे, आशिष खातू, परिमल भोसले, संतोष मालप, मधुकर निमकर, श्रीराम शिंदे, विनायक वरवडेकर, सचिन शिंदे, सुधीर शिंदे मंदार कदम आदी उपस्थित होते.