वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

यावर्षी पासून दोन नवीन शाखा सुरू _कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा समावेश

गुहागर l प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. आठवड्यातील सोमवार ते रविवार ह्या कालावधीत सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालू राहील. त्याचप्रमाणे औद्योगिक व्यवसायातील आवश्यकता व विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या दोन नवीन पदवी शाखाही सुरू करण्यात आले आहेत.

 

इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या दोन्ही अभ्यासक्रमांचा एकत्रित अभ्यास करता येईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाचा जसे 5G, 6G तंत्रज्ञान, चिप डिझाईन, रोबोटिक्स, आय.ओ.टी यांचा अभ्यास होईल. त्याचबरोबर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे मशिन्स लर्निग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स यांचाही अभ्यास होईल.

 

तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमामध्ये डाटा सायन्स, वेब डिझायनिंग,

सायबर सिक्युरिटी, मशिन लर्निंग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा अभ्यास करता येईल. या दोन्ही शाखांमधून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना टेस्टिंग इंजिनिअर, सॉफ्टवेअर डेव्हेलपर, सिस्टिम अॅनालिस्ट, सिस्टिम कंट्रोल इंजिनिअर, टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, एम्बडेड सिस्टिम डिझायनर अशा नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 

त्यामुळे या महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या *वरील दोन शाखांसोबत मेकॅनिकल अभियांत्रिकी, सिव्हिल अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इन्स्ट्रुमेटेंशन अभियांत्रिकी*या शाखाही उपलब्ध आहेत. तरी विद्यार्थ्यांनी या पदवी शाखांचा जास्तीतजास्त फायदा करून घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.