भर पावसात गावात पाणी टंचाईची स्थिती ; ग्रामस्थ संतप्त
मालवण | प्रतिनिधी : कोळंब गावाला भर पावसात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. पंपा मध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामस्थ संतप्त बनले आहे.
मे, जून या दोन महिने कोळंब गावाला मोठी पाणी टंचाई भेडसावत होती. एक दिवस आमदार नाईक यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा दिखावा केला. मात्र ग्रामस्थांचे हाल सुरूच होते. आता मुसळधार पाऊस पडल्याने विहिरीलाही पाणीसाठा भरपूर आहे. मात्र, पंपा मध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे. उन्हाळ्यात विहिरीला पाणी नसल्याने ग्रामस्थांनी समजून घेतले होते. मात्र, भर पावसात पाणी न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त बनले आहेत.











