मसदे चुनवरे ग्रामपंचायत उपसरपंच कलाधर कुशे यांचे निधन

मसुरे | प्रतिनिधी

विरण बाजारपेठ येथील रहिवासी व मसदे चुनवरे ग्रामपंचायत भाजप उपसरपंच कलाधर प्रताप कुशे ( ३८ वर्ष) यांचे अल्प आजाराने शनिवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते स्वादुपिंड आजाराने त्रस्थ होते. विरण परिसरात होणाऱ्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. विविध विकास कामात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचा लाकूड गिरणी तसेच हार्डवेअर व्यवसाय होता. पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय, पुतणे, काका, काकी असा मोठा परिवार आहे. येथील व्यावसाईक प्रताप कुशे यांचा मुलगा, तर बी. जी. कुशे, बबन कुशे, जनार्दन कुशे यांचा पुतण्या होत. रविवारी विरण येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.