अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा संशयित अखेर वेंगुर्ले पोलिसांच्या जाळ्यात

वेंगुर्ले : प्रतिनिधी
कॅम्प वेंगुर्ला येथून अल्पवयीन मुलीला पळऊन नेलेला राधानगरी, कोल्हापूर येथील आरोपी पंकज गौतम निकम, वय १९ वर्षे याला वेंगुर्ले पोलिसांनी त्या अल्पवयीन मुली सह तेंडोली, ता. कुडाळ येथील एका बागेतून ताब्यात घेतले. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून विशेष न्यायालय सिंधुदुर्ग येथे हजर केले असता. न्यायालयाने त्याला दिनांक ६ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास कामी पोलीस निरीक्षक श्री. अतुल जाधव यांच्यासह पोलीस सुरेश पाटील, चौहान, भाटे, धुरी यांनी काम पाहिले.
या अल्पवयीन मुलीला पळऊन नेल्याची तक्रार प्राप्त होताच २५ जून रोजी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलीस तपास करत होते. आणि आठ दिवसात पोलिसांनी संशयित आरोपीला त्या अल्पवयीन मुलीसह पकडण्यात यश मिळवले आहे.