राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन
उन्हाळे श्री महालक्ष्मी मंदिरात आयोजन
आठ निमंत्रित संघाचा सहभाग
राजापूर (वार्ताहर): राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने येथील दिवंगत उद्योजक प्रकाश कातकर यांच्या स्मरणार्थ शुक्रवार २६ सप्टेबर रोजी उन्हाळे येथे पारंपारीक टिपरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरानजीकच्या उन्हाळे येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सायं. ६ ते रात्रौ ११ या वेळात ही निमंत्रीत आठ संघात ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेताला रोख रक्कम ५ हजार, द्वितीय विजेत्यास रोख रूपये ३ हजार व तृतिय क्रमाकांस रोख रूपये २ हजार अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच या कार्यकमामध्ये न्यायाधिश कु. समृध्दी नार्वेकर, नासा/इस्त्रोसाठी निवड झालेली कु. पद्यलक्ष्मी गोंडाळ, तायक्वाँदो राष्ट्रीय खेळाडू कु. गार्गी बाकाळकर, खेलो इंडीया तायक्वाँदो लीग सुवर्णपदक विजेती कु. रिया मयेकर, मिताली घुमे, तायक्वाँदोमध्ये राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक पटकाविणारी ओवी बाईत यांचा राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.
या स्पर्धो उद्घाटन सद्गुरू ह.भ.प.विश्वनाथ (भाई) गोसावी यांच्या हस्ते होणार असून या कार्यकमाला युवानेत्या अपुर्वा सामंत, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस, पोलीस निरीक्षक अमित यादव, राजापूर अर्बन बँक संचालक ऍड.शशिकांत सुतार, शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख विश्वास राघव, भाजपा तालुकाध्यक्ष मोहन घुमे, व्यापारी संघटना अध्यक्ष संदीप मालपेकर, आंगले सरपंच श्रीधर सौंदळकर, माजी नगरसेवक विनय गुरव, समाजसेवक दिपक शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या टीपरी नृत्य स्पर्धेत श्री नवलादेवी महिला टिपरी नृत्य पथक शीळ, खांबलवाडी धोपेश्वर, शिवणेबुद्रुक खालचीवाडी, श्री महालक्ष्मी उन्हाळे सोडयेवाडी, सागवे गोठीवरे, अणसुरे बाकाळे, उन्हाळे कणेरेवाडी आणि श्री नवलादेवी टीपरी नृत्य मंडळ शीळ मुली हे संघ सहभागी होणार आहेत.
या कार्यकमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे यांनी केले आहे.











