धक्कादायक.! फोटो मॉर्फ करून युवतीची बदनामी

कणकवली तालुक्यातील संतापजनक घटना.!

कणकवली : तालुक्यातील एका युवकाची चॅटींग करित असताना ग्रामीण भागातील युवतीशी ओळख झाली. तिचा फोटो विवस्त्र तरूणीच्या चेहऱ्याच्या ठिकाणी ‘मार्फ’ करून सदरचे फोटो त्या तरूणाने स्टेटसला ठेवले.

यामुळे त्या तरूणीची नाहक बदनामी झाली. याबाबत त्या तरूणीने कणकवली पोलीसात फिर्याद नोंदविली आहे. याप्रकरणी पोलीसांनी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असुन याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव अधिक तपास करीत आहेत.