चिपळूण (प्रतिनिधी) : स्वच्छता ही सेवा २०२५ मोहीम अंतर्गत दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या थीम अंतर्गत स्वामी मठ रोड ते रामेश्वर मंदिर परिसर, चिपळूण येथे स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
चिपळूण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे यांचे मार्गदर्शनखाली, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांच्या आयोजन नुसार तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ही मोहीम पार पडली.
या उपक्रम करिता महात्मा गांधी प्रतिष्ठान सदस्य, अॅक्टिव्ह ग्रुप सदस्य, डी.बी.जे कॉलेज विद्यार्थी, आनंदराव पवार महाविद्यालय, युनायटेड इंग्लिश स्कुल, महाराष्ट्र हायस्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी अग्निशमन अधिकारी आनंद बामणे, शहर अभियंता दीपक निंबाळकर, मिळकत व्यवस्थापक सागर शेडगे, सहाय्यक अंतर्गत लेखापाल अवधूत बेंद्रे, संगणक अभियंता निवेदिता आंबेकर, विद्युत अभियंता संगीता तांबोळी, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, आस्थापना प्रमुख राजेंद्र जाधव, सर्व अधिकारी व आरोग्य मुकादम कर्मचारी उपस्थित होते.













