आमदार निलेश राणे यांनी भारतीय जनता पार्टी कणकवलीच्या दुर्गा मातेचे घेतले दर्शन

कणकवली;
कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश राणे यांनी भारतीय जनता पार्टी,कणकवली तालुका आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२५ ला भेट दिली व विराजमान झालेल्या आई दुर्गा मातेचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. संदेश (गोट्या) सावंत, माजी नगराध्यक्ष श्री. समीर नलावडे, भाजप तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री, जिल्हा भाजप युवा अध्यक्ष श्री. संदिप मेस्त्री, भाजप तालुका ग्रामीण अध्यक्ष श्री. दिलीप तळेकर,बाळा जठार, संजय कामतेकर ,समीर प्रभू गावकर,अजय गांगण, संतोष चव्हाण,दादा साईल, दीपक पाटकर आदी उपस्थित होते.