देवगड चांदोशी येथे घरफोडी

देवगड तालुक्यातील चांदोशी सिद्धार्थ नगर येथील बंद घराच्या मुख्य दरवाजाची कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला व घरातील २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १३ सप्टेंबर दुपारी १ते १७ सप्टेंबर स. १०.३० दरम्याने घडली असल्याची फिर्यादी प्रविण बाळकृष्ण जाधव राहणार सिद्धार्थनगर चांदोशी यांनी देवगड पोलिसांत दिली.

या घटनेची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे योग्य दिशेने फिरवून या घटनेतील संशयित आरोपी सागर भिकाजी शिंगाडे (२८)रा वरेरी कुळ्ये सडेवाडी
याला ताब्यात घेतले व देवगड न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कस्टडी ठोठावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदोशी सडा येथील तृप्ती कांबळे यांच्या मालकीचे घर त्या मुंबई येथे नोकरी निमित्त असल्याने त्याची देखभाल त्यांचे भाऊ करतात मुख्य दरवाजाची कडी कोयंडे तोडून चोरी झाल्याचे निदर्शनास येताच पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली या घटनेत घरातील १२ रुपये किमतीच्या कॅनन कंपनीचा डी एस एल आर कॅमेरा कॅनन कंपनीची पॉईंट १८.५५ mm लेन्स कॅनन कंपनीच्या चार्जरसह तसेच १० हजार रुपये किमतीचा टीसीएल ३२ इंच टीव्ही असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीने चोरून नेल्याचे आढळून आले . देवगड पोलीस तालुक्याचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांचे समवेत पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर निलेश पाटील योगेश महाले, दीपेश तांबे यांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. व देवगड न्यायालया समोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कस्टडी ठोठावण्यात आली आहे या आरोपी विरुद्ध ३०५,३३१(४)(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.