ग्रीन ट्रेल फाउंडेशनच्या ‘कोकण ट्रेल वोकाथॉन स्पर्धेला जिमखाना येथून सुरुवात

स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद.

ओटवणे (प्रतिनिधी ) सिंधुदुर्ग ग्रीन ट्रेल फौंडेशन व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वॉकाथॉन कोंकण ट्रेल 2025 या स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता जिमखाना सावंतवाडी येथे करण्यात आला. या स्पर्धेसाठी ठराविक अंतरावर जवळपास 10 किमी. अंतरावर चेक पॉईंट उभारण्यात आलेत या स्पर्धेसाठी ओटवणे येथे चेक पॉईंट उभारण्यात आला याचे संपूर्ण नियोजन रणझुंजार 38+ ग्रुप कडून करण्यात आले. या ग्रुपकडून भव्य स्वागता बरोबर स्पर्धकांच्या केलेल्या सोयीने स्पर्धक भारावून गेले. चेक पॉईंट वर झालेल्या स्वागताने आणि सोई सुविधाने स्पर्धकांनी आभार मानत पुढे मार्गस्त झाले.

या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात भारतातील क्रीडाप्रेमी सहभागी झाले आहेत. हा ट्रेल १०० किमी अंतराचा असून तो ५० तासांत पूर्ण करायचा आहे. याचबरोबर ५० किमी फॉरमॅट देखील उपलब्ध आहे, जो २५ तासांत पूर्ण करायचा आहे. यासाठी देशभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत.

सावंतवाडी जिमखाना मैदान येथून शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता वॉकाथॉनला प्रारंभ झाला असुन तिसऱ्या दिवशी रविवारी याच ठिकाणी समारोप होणार आहे. वॉकाथॉनचा मार्ग सावंतवाडी चराठे कारीवडे माडखोल,सरमळे, वेत्ये, न्हावेली पेंडूर, मातोंड, तुळस, अणसुर, परबवाडा, उभादांडा, सागरेश्वर, वेतोरे, वजराठ, मळगाव आणि सावंतवाडी असा आहे. या वॉकाथॉनच्या प्रत्येक १० किमीवर बावळाट, ओटवणे, माजगाव, सोनुर्ली, तुळस, वेंगुर्ले, खानोली, आडेली, नेमळे, सावंतवाडी या दहा ठिकाणी चेकपॉईंट असून त्या ठिकाणी वैद्यकीय मदत, पाणी, अन्न व सुरक्षेची व्यवस्था केली आहे.

हिरवाईसह नयनरम्य निसर्गातून, डोंगर-घाट आणि समुद्रकिनारा, नदीकाठ, जंगल, गाव, वाडी यातून चालण्याचा एक अनोखा आणि आव्हानात्मक असा हा उपक्रम आहे.आणि यातून कोंकण आणि त्यातील गावे या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत.या स्पर्धेत सहभागी झालेल्या टीमला त्यांच्या मर्यादा ओलांडण्याची, कठीण ध्येय गाठण्याची आणि कोकणातील निसर्ग, संस्कृती व लोकजीवन अनुभवण्याची ही एक उत्तम संधी आहे. या ज्येष्ठ व अनुभवी स्पर्धकांबरोबर चालण्याची, संवाद साधण्याची व निरीक्षणातून शिकण्याची संधी स्थानिकांना तरुणवर्गाला मिळावी हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून ग्रीन ट्रेल फौंडेशन ने आयोजन केले आहे.फाऊंडेशनने १० किमी “फन वाँक” यासोबतच आयोजित केला आहे.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये व विविध संघटनांना यांचा मोठा सहभाग लाभत आहे.

ग्रीन टेल फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सचिन बिर्जे, उपाध्यक्ष योगेश करंदीकर, सचिव जयंत जोशी या बरोबर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक मंडळानी कष्ट घेतले आहेत ओटवणेत रणझुंजार मित्रमंडळाचे कार्यकर्ते शेखर गावकर, अजित आंगचेकर, अनंत तावडे,रवींद्र म्हापसेकर, सोमा उर्फ बाळा गावकर, पांडुरंग उर्फ बाळु गावकर, गजानन रासम, बाळू गावकर,उमेश म्हापसेकर, मिलिंद म्हापसेकर, नंदू म्हापसेकर, रामदास पारकर, संतोष तावडे, ज्ञानेश्वर मयेकर, किरण गावकर, दीपक गावकर, लुमा जाधव , विश्वनाथ बोर्ये, बाळू गावकर, विजय गवंडे, बाळा गवंडे, जयसिंग गावकर, संतोष कासकर, संतोष भैरवकर, गजानन रासम, महेंद्र जाधव आदींनी सहकार्य केले. रविवारी जिमखाना येथे या स्पर्धेचा समारोह होणार आहे.