ग्रामसंवाद कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ:-
तालुक्यातील कुडाळ ग्रामपंचायतच्या माध्यमातुन ग्रामसंवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच अमित मढव यांनी मागील अडीच वर्षाचा कार्यकाळात झालेल्या कामकाजांचा लेखाजोखा ग्रामस्थांच्या समोर मांडला तसेच पुढील काळात करावयाच्या विकास कामात नियोजनाबाबत ग्रामसंवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना कृषी, आरोग्य, व इतर शासकीय योजना तसेच विविध बँका त्यांच्या योजना ह्या बाबतीत माहिती तसेच ग्रा. प. व इतर योंजनातून गेल्या अडीच वर्षात किती विकास कामे झाली व येणाऱ्या काळात प्रस्तावीत कामे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला गेल्या अडीच वर्षात सर्व विभागतून सहकार्य करणाऱ्या व सामाजिक कार्य करणाऱ्या 40 आदर्श व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. तसेच गावातील सर्व मायबाप जनतेचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच गावातील नागरिकांना विविध वस्तूंचे वाटप, जि. प. शाळांना डिजिटल वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पं. स. कुडाळ गटविकास अधिकारी, प्रफुल्ल वालावलकर, विस्तार अधिकारी संजय ओरोसकर, धरणे, वीज वितरणचे श्री. फोजदार, माजी प. स. सदस्य बाळू मडव,सरपंच अमित मडव, उपसरपंच पावसकर, माजी उपसरपंच विजय करंदीकर,अंकुश म्हाडदळकर, तंटामुक्ती अध्यक्ष धनंजय सावंत, निवृत्त मुख्याध्यापक अरुण सावंत, ग्रा. प. सदस्य बाबा परेरा, उदय मडव, सौ. निर्मला पालव, श्री. पिंटो विविध क्षेत्रातील मान्यवर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सीताराम चव्हाण यांनी केले तसेच सरपंच अमित मडव यांनी गेल्या अडीच वर्षात ग्रामपंचायत ला केलेल्या सहकार्या बद्धल सर्वांचे आभार मानले व येत्या अडीच वर्षाच्या काळात मा. आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमातून उर्वरित विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन ही दिले तसेच ग्रामपंचायत फ़ंड वगळून इतर फंडातून विविध विकास कामे मंजूर करून दिल्या बद्धल मा. खासदार नारायण राणे साहेब व आमदार मा. निलेशजी राणे साहेब यांचे आभार व्यक्त केले.













