मसुरे | झुंजार पेडणेकर : बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा व केंद्र शाळा कट्टा नं.१ यांच्या संयुक्त विद्यमाने ” चला वाचू आनंदे, इंग्रजी बोलू फडाफड” या उपक्रमाचा शुभारंभ केंद्र शाळा कट्टा येथे करण्यात आला.
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी
व इंग्रजी बोलण्यातील भीती दूर करण्यासाठी सदरचा उपक्रम दर शनिवारी केंद्र शाळा कट्टा येथे सकाळी ८ ते ११ या वेळेत सुरु राहाणार आहे.
विविध विषयावरील पुस्तके मुलाना व पालकाना वाचण्यासाठी उपलब्ध करून त्यावर स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.इंग्रजी कसे बोलावे याचे मार्गदर्शनश्रीमती सायली चव्हाण करणार आहेत.सायली चव्हाण यानी इंग्रजी बोलण्याचे महत्व विद्यार्थ्याना समजावून सांगितले.इंग्रजीतून संवाद कसा करावा.नेहमीच्या वापरातील वस्तूंची नावे
इंग्रजीत कशी घ्यावीत याचे मार्गदर्शन केले.
ग्रंथपाल सुजाता पावसकर यानी या उपक्रमाची माहिती देऊन वाचनाचे महत्व विशद केले.
या कार्यक्रमास दीपक भोगटे, सायली चव्हाण, सुनील चव्हाण, श्रीमती धुत्रे, श्रीमती डगरे ,
प्रियांका भोगटे, मुख्याध्यापक श्री ठाकूर,
संपदा भाट, माळवदे मॅडम, विशाखा सावंत, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.