टोपीवाला हायस्कुल मार्गावरील ‘तो’ धोकादायक खड्डा बुजवा

सामाजिक कार्यकर्ते निलेश दुधवडकर व नागरिकांनी वेधले मालवण पालिका प्रशासनाचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील टोपीवाला हायस्कूल मार्गावर रस्ता खचून मोठा खड्डा पडला आहे. सदर रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. शाळांमध्ये जाणारी मुले या रस्त्याने प्रवास करत असतात. तरी अपघाताचे निमंत्रण ठरणारा हा खड्डा तातडीने बुजवण्याबाबत उपाययोजना व्हाव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश दुधवडकर व नागरिकांनी मालवण पालिका प्रशासनाकडे केली.

 

यावेळी मोहन वराडकर, विलास मुणगेकर, रमण वाईरकर, हर्षल मालंडकर आदी उपस्थित होते.

 

वाहन चालक तो खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करतात. असे होताना या मार्गावरून जा ये करणाऱ्या विद्यार्थ्याना अपघात घडू शकतो. तरी तो खड्डा तात्काळ बुजवावा अशी मागणी पालिका आवेक्षक सुधाकर पाटकर यांना दिलेल्या निवेदन माध्यमातून करण्यात आली आहे.

 

दरम्यान, गुरुवारी जोरदार वाऱ्यामुळे दांडी मोरेश्वर वाडी येथील स्मशानभूमीच्या निवारा शेडचे छप्पर उडून गेलेले आहे. कोसळलेले छप्पर स्मशानभूमीच्या प्रवेश मार्गावरुन बाजूला करत याठिकाणी दुरुस्ती व उपाययोजना कराव्यात अशीही मागणी निवेदनाच्या माध्यमातून निलेश दुधवडकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

 

फोटो : मालवण शहरातील समस्या प्रश्नी नागरिकांच्या वतीने पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. (अमित खोत, मालवण)