मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कला,वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ही तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. महाराष्ट शासनातर्फे आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन पंचायत समिती,मंडणगडचे बालविकास अधिकारी श्री विशाल जाधव यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी प्रकल्प पर्यवेक्षिका सौ.नीना जोशी, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.पाटील मॅडम, उपप्राचार्य श्री हुल्लोळी सर,मंडणगड महिला संघटनेच्या सौ.आर्या भागवत,सौ.मंजिरी जोशी;तायकांदो अॅकेडमीचे श्री विश्वदास लोखंडे,सौ.काजल लोखंडे तसेच महाविद्यालयाच्या सहशिक्षिका सौ.आटपाडकर मॅडम,सौ.खताते मॅडम आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सौ.सूर्यवंशी मॅडम हजर होते. याप्रसंगी सौ.आर्या भागवत आणि सौ मंजिरी जोशी यांनी महिला व मुलींवरील हिंसाचार यासंबंधात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.सौ.नीना जोशी यांनी भविष्यात उद्भवू शकणाऱ्या समस्या यावर मार्गदर्शन केले.
श्री विश्वदास लोखंडे यांनी या कार्यशाळेची उद्दिष्टे स्पष्ट केली. मंडणगड पोलीस स्थानकाचे श्री तुकाराम पारधी,श्री वैभव गमरे,श्री सुहास मांडवकर,श्री शिवाजी पवळे तसेच श्रीमती
वैशाली पवार यांनी सायबर क्राईम याविषयी उद्बोधन केले.
पुढील दोन दिवशीय कार्यशाळेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना स्वसरंक्षणाचे धडे देण्यात आले.मंडणगड तायकांदो अॅकदमीचे श्री विश्वदास लोखंडे,सौ.काजल लोखंडे,कुमारी मयुरी खांबे,कुमार श्रेयस जाधव यांनी प्रशिक्षण दिले.
याप्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री विशाल जाधव,प्रकल्प पर्यवेक्षिका सौ.नीना जोशी, प्राचार्या सौ.पाटील मॅडम, उपप्राचार्य श्री हुल्लोळी सर, सहशिक्षक याचावाड सर,सहशिक्षिका सौ.आटपाडकर मॅडम,सौ.खताते मॅडम आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.