मंडणगड | प्रतिनिधी : सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना, तालुक्यातील लाल बहादूर शास्त्री हायस्कूल, दहागाव येथील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या २०० राख्या पाठवण्यात आल्या आहेत ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हुलगे यांच्या कल्पनेने घेण्यात आला,
भारत देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असणाऱ्या जवानांना रक्षाबंधनाचा सण घरी साजरा करता येत नाही. ना कोणता सण, ना कोणता समारंभ अशा स्थितीत हे जवान देशाचे रक्षण करत असतात. त्यांना आपल्या बहिणींची रक्षाबंधना दिवशी उणीव भासू नये यासाठी दहागाव हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी जवानांसाठी स्वतः राख्या बनवून पाठवल्या आहेत. या राख्या कश्मीर या ठिकाणी पाठवून देशप्रेम जपले आहे या उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री हुलगे सर यांची प्रेरणा लाभली.
प्रशालेचे कला शिक्षक जितंद्र कलमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी विविध धागे, मणी यांच्या साह्याने रंगबिरंगी राख्या तयार केल्या. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षिका सौ. पालांडे, शिक्षक प्रतिनिधी सौ.नाटेकर. श्रीम.पवार, श्री. जाधव पी.बी., श्री. माने जी.एन, लिपिक श्री. दळवी ,शिपाई श्री. गुडेकर भाऊ,श्री. गौड विद्यार्थी आदींचे सहकार्य लाभले..











