चिंदर गावात अज्ञात रोगाने दोन दिवसांत तब्बल ११ गुरे दगावली

आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील चिंदर गावात दोन दिवसात तब्बल ११ गुरे दगावल्याची घटना घडली आहे. अज्ञात आजारामुळे ही गुरे दगावली असून निश्चित आजाराचे निदान झालेले नाही. गुरे दगावत असल्याचे समजल्यानंतर रविवारी सकाळी जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वप्नील अंबी यांच्या समवेत पशू वैद्यकीय पथक चिंदर येथे दाखल झाले होते या पथकाने मृत्यू झालेल्या जनावरांचे शविच्छेदन केले. तपासणी साठी काही नमुने घेतले असून ते पुणे येथील प्रयोशाळेत पाठवले जणार आहेत त्यांनतर आजाराचे निश्चित कारण सामोरं येणार आहे. नव्याने उगवलेल्या रानावरील बुरशीजण्य विषारी पदार्थ पोटात गेल्याने गेल्याने ही गुरे दगावली जात असल्याचा प्राथमिक अंदाज या पथकाने दर्शवला

चिंदर गावात बहुतांश शेतकरी हे आपली गुरे उघड्या माळरानावर चरण्यासाठी सोडतात गेल्या दोन दिवसांपासून सकाळी चरावयास गेलेली गुरे सायंकाळी घरी परतल्यानंतर गोठ्यात बांधल्यानंतर रात्रीच्या सुमारास या धडधाकट आसलेल्या गुरांच्या घशा कडील भागाला सूज येऊन गुरांचे पोट मोठ्या प्रमाणात फुगले अंगात ताप अशी अवस्था होऊन गुरे रवंथ करण्याचेही बंद करण्याची थांबली चारा खाण्याचे सोडुन देत काही वेळातच ती गुरे दगावत होती अशी महिती स्थानीक शेतकऱ्यानी आलेल्या पशूवैद्यकीय पथकास दिली आहे. अशाच पद्धतीने चिंदर येथील शेतकरी गणेश पाटणकर, संतोष पाटणकर, गणेश तावडे, वसंत पाडावे, मिलिंद चिंदरकर, श्रीकांत कांविनदे, बाळा कांविनदे आनंद चिंदरकर,निलेश रेवडेकर दिलीप परब यांची दोन दिवसांत ११ गुरे दगावली आहेत.

गुरे दगावत असल्याचे समजल्यानंतर
रविवारी सकाळी जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वप्नील अंबी यांच्या समवेत जिल्हा पशुधन विकास चिकित्सालय जाणवली डॉ.सतीश राऊत, आचरा येथील पशु वैद्यकीय अधिकारी  डॉ.मिलिंद कांबळी,डॉ. वसंत सवादे, डॉ. महेश परुळेकर, परिचर दत्तगुरु गांवकर,सागर तांबे असे पशूवैद्यकीय पथक दाखल झाले होते या पथकाने सुरुवातीला दगावलेल्या काही गुरांचे शविच्छेदन केले व तपासणीसाठी काही नमुने गोळा केले त्यांनतर या पथकाने ज्या ठिकाणी गुरे चरण्यासाठी जात होती अशा भागाची पाहणी केली तेथें उगवलेल्या वनस्पतीही तपासून त्यातील बदल नोंद करून घेतले आहेत. जुन मध्ये पाऊस न होता जुलै महिन्यात बऱ्याच कालावधी नंतर सतत पडणाऱ्या पावसाचे काही रानावर बुरशीजण्य पदार्थ दिसून आला आहे.
चरायला गेलेली गुरे रात्री गोठ्यात येऊन दगावत असल्याने या भागातील शेतकऱ्यानी गुरे रानमाळावर न सोडता काही दिवस बांधून ठेवावीत गुरांमध्ये कोणतेही लक्षणें दिसू लागल्यास पशु वैद्यकीय विभागाशी संपर्क करावा जे शेतकरी गुरे रानात सोडत असतील त्यांनी आपली गुरे कूठे चरून आलीत याकडे लक्ष ठेवावे जेणेकरून गुरांना त्रास जानू लागल्यास उपचार करणे शक्य होईल असे आवाहन पशू वैद्यकीय विभागाकडून करन्यात आले आहे.