रामपूर अलेटीवाडी, गावणंगवाडी, तांबी, डोंगराळ, दुर्गम ग्रामीण भागात रस्त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांना निवेदन

चिपळूण (वार्ताहर) : रामपूर अलाटेवाडीचे नवतरुण उत्साही मित्र मंडळांने गावणंगवाडी ग्रामस्थांनी रामपूर अलाटेवाडी मराठी शाळा ५० मीटर संरक्षण भिंत, मोऱ्यांसह, गावणंग वाडी, तांबी हा भाग अत्यंत डोंगराळ, दुर्गम, ग्रामीण आहे. येथे रस्ता अजिबात नाही. ग्रामीण भागातील लोकांना रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून ५ कि.मी. खडीकरण, मजबुतीकरण, डाबंरीकरण, २० फूट रुंदीकरणासह रस्त्याला निधी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांना अलाटेवाडी, गावणंग वाडी ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्ष गोपीनाथ माळी, रामपूर ग्रा.प. चे माजी सदस्य दत्ताराम गावडे, संतोष गावणंग, तुकाराम गावणंग यांनी निवेदन दिले.
अनिलकुमार जोशी यांनी सांगितले की, रामपूर ग्रामपंचायतीचा ठराव मिळाला असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सार्वजनिक बांधकाम खाते मंत्री शिवेंद्रसिंह भोसले साहेब, नामदार आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, रायगड, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ खासदार सुनिल तटकरे साहेब, आमदार शेखर निकम, कार्यकारी अभियंता सां.बा. विभाग रत्नागिरी, चिपळूण जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून रस्त्याचे काम मार्गी लावू, असे प्रतिपादन केले.