जिल्हा बँकेचे संचालक डॉ.अनिल जोशी यांचे निधन

गुहागर | प्रतिनिधी

रत्नागिरी मध्यवर्ती बँकचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष, गुहागर मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, राहणार नरवण यांचे काल शनिवारी रात्री दुःखद निधन झाले.

पक्षाच्या तसेच विविध संघटनांच्या माध्यमातून डॉ.जोशी हे नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्यावर सायंकाळी 4 वाजता नरवण येथे अंत्यसंस्कार होणार आहे.त्यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.