तळवली पंचायत समिती गणातून काँग्रेसकडून रियाज ठाकूर यांना उमेदवारी निश्चित

गुहागर प्रतिनिधी
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले” असून, काँग्रेसचे माजी गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर यांनी तळवली पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी देखील त्यांच्या कामाची व अनुभवाची दखल घेऊन त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
रियाज ठाकूर हे काँग्रेसचे माजी गुहागर तालुकाध्यक्ष आहेत.तसेच पक्षविरहित काम करताना देखील ते नेहमीच गोरगरिबांसाठी वैद्यकीय सेवेसाठी धाऊन जात असतात.तसेच सामाजिक कामात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.याचीच पोचपावती म्हणून पक्षाने त्यांना तळवली पंचायत समिती गणातून उमेदवारी निश्चित केली आहे.आपला दांडगा जनसंपर्क आणि संघटनात्मक अनुभवाच्या जोरावर हा गण जिंकून आणण्याचा विश्वास रियाज ठाकूर यांनी व्यक्त केला असून, पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करून परिसराचा कायापालट करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. ठाकूर यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.