कुर्णे येथील साग चोरी प्रकरणी आणखी चार जण ताब्यात 

एक क्रेन, एक ट्रक आणि दोन बोलेरो पिकअप अशी चार वाहने जप्त 

लांजा (प्रतिनिधी) वनविभागाच्या कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रातून झालेल्या साग चोरीच्या घटने प्रकरणी वनविभागाने आणखी चार जणांना ताब्यात घेतले असून या घटनेत वापरण्यात आलेली आणखी एक क्रेन, एक ट्रक आणि दोन बोलेरो पिक अप अशी एकूण चार वाहने आणि दोन लाख १२ हजार रुपयांचा साग असा कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

वन विभागाच्या कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रातून साग चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी वन विभागाने एकूण सात जणांना ताब्यात घेतले होते. तसेच या घटनेत वापरण्यात आलेली क्रेन जप्त करण्यात आली होती. असा लाखो रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला होता.त्यानंतर या घटनेत आणखी काहीजण असण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाकडून कार्यवाही सुरू होती.

दिनांक २६ सप्टेंबर रोजी या साग चोरी प्रकरणी वनविभागाने संशयित आरोपी संजय शांताराम गुरव (रा. खारेपाटण .तालुका. कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग), श्रेयस गोपाळ बारस्कर (रा. कुंभवडे ), प्रकाश गुणाजी पुजारे (रा. कुंभवडे), अतुल भाऊ जाधव (रा. कुंभवडे)यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी व श्रेयस गोपाळ बारस्कर यांनी साग इमारती नग वाहनातून उतरविणे व पुन्हा भरणे यासाठी वापरण्यात आलेली क्रेन नंबर MH 08 BE4185, बोलेरो पिकअप MH 08 BC 2005 मौजे रानतळे वनरक्षक वनपाल निवासस्थान येथे आणून दिली व जप्त करून ताब्यात घेतली, तसेच संजय शांताराम गुरव यांनी राजापूर वनपरिमंडल कार्यालय येथे दिनांक 24/8/2025

रोजी कुर्णे शासकीय वनातून साग इमारती माल रात्री ट्रक मध्ये भरून मौजे कुंभवडे येथे उतरुन, घेऊन वाहन क्रमांक MH 08 W 8424 हे परिमंडळ वन अधिकारी राजापूर आवारात हजर केले. तसेच मंदार मनमोहन बारस्कर रा. कुंभवडे यांनी सदर गुन्हे कामी मजुरांना कुरणे येथे सोडण्यासाठी वापरण्यात आलेली बोलेरो पिकअप वाहन MH 08 AP 8584 ही परिमंडळ वनधिकारी कार्यालय आवारात आणून हजर केली, वरील सर्व वाहने जप्त करून चौकशी साठी ताब्यात घेतली आहेत.

सदर गुन्ह्य़ात आजुन संशयित वाहने बाहेर असल्याने याकामी सदर गुन्हाचा तपास चालू आहे. तसेच इमारती साग नग एकूण 54 /3.024 घन मीटर इतका माल जप्त करून ताब्यात घेण्यात आला ,एकूण साग इमारती नगांची शासकीय दरानुसार

किंमत रू. 2,12,070 आहे.‌ तसेच सदर वन गुन्ह्यामध्ये समाविष्ट असणारी वाहने व इतर साधन सामग्री इत्यादी बाबींचा तपास चालू असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.