सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्यावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना, शेतकर्यांना आणि सामान्य जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री (CM) मदत निधीमध्ये (रिलीफ फंड) जास्तीत जास्त योगदान देण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी सीएम रिलीफ फंडासाठी ५१ हजार रुपयांची भरीव मदत केली आहे.
या मदतीचा धनादेश श्री. गावडे यांनी सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रसंगी भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या ‘नमो युवा रन’ कार्यक्रमाचे औचित्य साधण्यात आले होते. नैसर्गिक संकटात सापडलेल्या जनतेला हातभार लागावा या उदात्त हेतूने ही मदत करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, राजू राऊळ, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश चिंचळकर, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा संतोष पुजारे, कुडाळ युवामोर्चा मंडलअध्यक्ष तन्मय वालावालकर, कणकवली मंडलअध्यक्ष सर्वेश दळवी, कणकवली युवामोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे, जिल्हा बँक संचालक रवींद्र माडगावकर, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, सावंतवाडी युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, आंबोली युवामोर्चा अध्यक्ष निलेश पास्स्ते, बांदा युवा मोर्चा अध्यक्ष सिध्देश कांबळी, वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष प्रणव वायंगणकर तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













