लांजा तहसील कार्यालय येथे १ ऑक्टोबर रोजी लोक अदालतीचे आयोजन 

लांजा( प्रतिनिधी) लांजा तहसील कार्यालय येथे १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे .

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लांजा तालुक्यातील अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे . लांजा तहसील कार्यालयाच्या सभागृहात १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ही लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधित पक्षकार ,नागरिकांनी या लोक अदालतीला उपस्थित राहून आपली प्रलंबित प्रकरणे सोडवण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे.