गुहागरची आर्या जाधव भाषण स्पर्धेमध्ये देशात चौथी

गुहागर भाजपा शहराच्या वतीने केला सन्मान      

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर शहरातील आर्या मनोज जाधव इयत्ता आठवीच्या बाल भारती पब्लिक स्कूल आर. जी पी पी. एल अंजनवेल येथे शिक्षण घेत असलेल्या या विध्यार्थीने हरियाणा फरीदाबाद येथे झालेल्या भाषण स्पर्धेत हिने चौथ्या क्रमांकाचे नॅशनल लेवल परफॉर्मर म्हणून मान मिळवला असून तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहें.

नुकत्याच झालेल्या या स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर देशातून 5 हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातून राज्य पातळीवर 3 हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 3 हजार विद्यार्थ्यांमधून 60 विद्यार्थी राष्ट्रीय पातळीसाठी निवडले गेले. त्यानंतर अंतिम स्पर्धा ही हरियाणा येथील फरीदाबाद येथे घेण्यात आली. यावेळी आर्या जाधव हिने ”सत्यभाषी बनण्याचे महत्त्व” या विषयावर सात मिनिटांचे हिंदी विषयातून भाषण सादर केले. स्पष्ट उच्चार आणि आत्मविश्वास असलेल्या आर्या जाधव हिने उपस्थित श्रोत्यांची मन जिंकत चौथ्या क्रमांकाचे नॅशनल लेवल परफॉर्मर्स म्हणून आपले स्थान निश्चित केले. तिच्या मेहनतीचे आणि आई-वडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नुकताच गुहागर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष नरेश पवार तालुकासरचिटणीस संतोष सांगळे. महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रांजली कचरेकर. शहराध्यक्ष स्मिता जांगली. माजी नगरसेवक उमेश भोसले. युवा अध्यक्ष मंदार पाळशेतकर, सौ. दीप्ती सांगळे. प्रशांत कचरेकर . सदाशिव पाळशेतकर आदी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन आर्या जाधव हिला शुभेच्छा दिल्या.