विजयदुर्ग (प्रतिनिधी) : विविध प्रश्नोत्तरे, गेम्स, खेळ या माध्यमातून उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या श्री राधाकृष्ण मंडळ, गोपाळकृष्णवाडी विजयदुर्गच्या होम मिनिस्टर स्पर्धेत सौ. प्रियांका सिद्धेश डोंगरे हिने विजेतेपद मिळवले. तिला अतुल आंबेरकर पुरस्कृत आकर्षक पैठणी मंडळाचे अध्यक्ष योगेश डोंगरे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आली. दरम्यान, या स्पर्धेमध्ये कशिश संजय सकपाळ हिला उपविजेतेपद पटकावताना विजय पडवळ पुरस्कृत आकर्षक घड्याळ भेट देण्यात आले.
ही स्पर्धा दोन विभागात घेण्यात आली. अंतिम फेरीमध्ये मयुरी महेश बिडये, प्रियांका सिद्धेश डोंगरे, रसिका राजेंद्र शिंदे, सायली संतोष पडवळ आणि कशिश संजय सकपाळ या पाच महिला आल्या. पारितोषिक वितरण कार्यक्रमावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश डोंगरे, दिपाजली तळेकर, महेश बिडये, दर्शन डोंगरे, दिलीप शिंदे, दशरथ तळेकर, सुमित जाधव, नितेश जाधव, यश राजम, पृथ्वीराज धुळप, सिद्धेश डोंगरे, वैदेत मिठबावकर व अन्य सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन गणेश मिठवावकर यांनी आपल्या प्रभावी शैलीत सादर केले.












