जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत आद्या नाईक, रिषभ मुळीक व अनिल चौकेकर प्रथम

भाजपा आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहिर

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी, विधानसभा सावंतवाडी यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धा रविवार, दिनांक २८-०९-२०२५ रोजी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, सर्व गटातील विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
​या स्पर्धेमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’, ‘विकसित भारत’, आणि ‘डिजिटल इंडिया’ या विषयांवर आधारित चित्रे काढण्यात आली. सदर स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली होती.
​गटनिहाय विजेते:

​पहिला गट (इ. १ ली ते इ. ५ वी – रंगभरण स्पर्धा): या गटात आद्या पूनम निनाद नाईक हिने प्रथम क्रमांक मिळवला, तिला रु. २०००/- चे रोख पारितोषिक जाहीर झाले आहे. वेदा गुरुप्रसाद राणे (रु. १५००/-) द्वितीय, दृवा अजित सावंत (रु. १०००/-) तृतीय, तर दिप जयेश स्वार (रु. ५००/-) आणि मनिष महेंद्र शिंदे (रु. ५००/-) यांनी अनुक्रमे चतुर्थ व पंचम क्रमांक पटकावला.

​द्वितीय गट (इ. ६ वी ते इ. १० वी): या गटात रिषभ रविंद्र मुळीक याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम पारितोषिक (रु. ३०००/-) जिंकले. तन्मय पुरुषोत्तम नेरुरकर (रु. २५००/-) द्वितीय, समिक्षा शामराव जाधव (रु. २०००/-) तृतीय, तर श्रेया साबा राऊळ (रु. १०००/-) आणि ऋतुजा संतोष जाधव (रु. १०००/-) यांनी चतुर्थ व पंचम क्रमांक मिळवला.
​तृतीय गट (इ. ११ वी ते वरील खुला गट): खुल्या गटामध्ये आदेश अनिल चौकेकर याने प्रथम क्रमांक (रु. ५०००/-) पटकावला, तर अक्षय अनिल चौकेकर (रु. ४०००/-) याने द्वितीय आणि निलेश संतोष चव्हाण (रु. ३०००/-) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच, सर्वेश मधुसूदन खांबल (रु. १५००/-) आणि वैभवी जीवन कुडाळकर (रु. १५००/-) यांनी अनुक्रमे चतुर्थ व पंचम स्थान मिळवले.

​या स्पर्धेसाठी प्रा. सिद्धेश नेरुरकर सर, प्रा. तुकाराम मोरजकर बांदेकर सर (फाईन आर्ट कॉलेज सावंतवाडी), बाबुराव मालवणकर सर (मा. कला शिक्षक, आर.पी.डी. हायस्कूल सावंतवाडी) आणि योगेश गावीत सर (कलाशिक्षक, आर.पी.डी. हायस्कूल, सावंतवाडी) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

​भारतीय जनता पार्टी, विधानसभा सावंतवाडी यांच्या वतीने सहभागी सर्व स्पर्धकांचे व विशेषतः बक्षिस पात्र स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. बक्षिस पात्र स्पर्धकांना सन्मानपत्र व रोख पारितोषिक समारंभासाठी लवकरच कॉलद्वारे कळविण्यात येईल. विजेत्यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालय, सावंतवाडी येथे आपले आधारकार्ड किंवा शाळेचे ओळखपत्र दाखवून सन्मानपत्र व रोख पारितोषिक स्वीकारावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. दशरथ मांजरेकर (संपर्क क्रमांक: ७८७५५२५४९६ किंवा ९४२२३ ९२८४७) यांच्याशी संपर्क साधावा.