माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील वायरी प्रभागातील विकास कामाना निधी देण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.आडवण भागातील गणेश विसर्जन स्थळ हे रस्त्यालगत असून खोल आहे, ते बांधणे आवश्यक आहे. तसेच वस्ती लगत असल्याने सुशोभीतही करण्याची आवश्यकता आहे. तसेच मुस्लिम महोल्यालगत कब्रस्थान आहे. या कब्रस्थानात वज्रखाण्याची इमारत नादुरुस्त आहे. तरी बांधकाम करण्याची आवश्यकता आहे. सदर काम मागील चार वर्ष पाठपुरावा करुनही अल्पसंख्यांक निधी न मिळाल्याने होऊ शकले नाही तरी वरील दोन्ही कामांसाठी जिल्हा नियोजन मधून निधी दयावा, अशी मागणी आप्पा लुडबे यांनी केली आहे.