अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने पूरग्रस्ताना मदतीचा हात!   

अक्कलकोट | प्रतिनिधी :    अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने महापूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षास स्थानिक व जिल्हा आपत्ती प्रशासनाच्या सुचनेनुसार गहू, तांदूळ, साखर, रवा इत्यादी प्रकारचे धान्य कीट व मंदीरात वापरलेल्या शाल, सोवळे, उपरणे इत्यादी

श्री स्वामी समर्थांच्या कृपावस्त्रे स्वरुपातून मदतीचा हात पुढे करण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. सलग एक महिन्यापासून शहर व जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसाचा शेतकरी वर्गास व सर्वसामान्य नागरीकाना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभुमीवर या नैसर्गिक आपत्ती काळात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या धान्य स्वरुपातील मदतीचा हातभार लागणार आहे. धान्य स्वरुपातील ही देवस्थानची मदत देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे अध्यक्षतेखाली

तुळजापूर मंदिर समिती येथील पी.एस.आय.प्रशांत कुलकर्णी यांचे हस्ते धान्य किटचे पूजन करून चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते धान्य कीट प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी पुणे वाहतुक नियंत्रण विभाग पोलीस खात्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री भोसले, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, चंद्रकांत गवंडी, संतोष पराणे, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, गिरीश पवार, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, चित्तरंजन अगरथडे, श्रीकांत मलवे, गणेश इंगळे, सागर गोंडाळ, आकाश चुंगीकर, गवळी, शंकर मलवे, समर्थ स्वामी, सागर दळवी, ओंकार महाडीक, सचिन कटकधोंड

इत्यादी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती व संकटकाळात श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडून प्रशासनास नेहमीच मदतीचा हातभार लावण्यात येतो. गतकाळातील कोरोना सारख्या भिषण संकटात मंदीर समितीने प्रशासनास केलेले सहकार्य व मदत सर्वानी पाहीलेच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदीर समितीचा सामाजिक सहकार्यात नेहमीच वाटा राहिलेला आहे. सद्याच्या पुरग्रस्तांना मंदीर समितीच्या या मदतीचा लाभांश नक्कीच दिलासा देणारा ठरेल असे श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट चेअरमन महेश कल्याणराव इंगळे यांनी सांगितले.