वेंगुर्ले : प्रतिनिधी
साहित्य प्रेरणा कट्टा,आजगाव च्या सलग साठाव्या मासिक कार्यक्रमांतर्गत र.ग.खटखटे ग्रंथालय,शिरोडा यांचे सहयोगाने खटखटे ग्रंथालयात रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कोजागरी कविसंमेलन आयोजित केले आहे.
कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला होणारे हे कविसंमेलन सर्वांसाठी खुले आहे. कविता स्वरचित असावी किंवा अन्य कविताही सादर करता येतील, पण त्यावेळी मूळ कवीचे नाव सांगणे आवश्यक आहे. तसेच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गीतगायन, नाट्यछटा, कथाकथन आदी कलाही सादर करता येतील. तरी कविता सादर करू इच्छिणाऱ्यांनी वा इतर कला सादर करू इच्छिणाऱ्यांनी आपली नावे शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पर्यंत ग्रंथालयात नोंदवावीत, असे आवाहन दोन्ही संस्थांमार्फत करण्यात आले आहे.












