माखजन येथे अंगणवाडी सेविकांसाठी राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम

गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे माखजन बीट अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम साजरा झाला.
प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका व काम खूप महत्वाचे आहे.या धर्तीवर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.पोषण अभियानांतर्गत झालेल्या कार्यक्रमात अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस व पूरक पोषण आहार कसा द्यावा.त्या मुलांच्या पालकांना आहाराविषयीं कसे मार्गदर्शन करावे याविषयीं सांगण्यात आले .किशोरवयीन मुलींना आहार कसा असावा,आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयीं सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
गरोदर व स्तनदा माता यांना पूरक पोषक आहार देण्याची योग्य पद्धत कोणती व कोणती काळजी घ्यावी याविषयीं सांगण्यात आले.रानभाजा व त्यांचे महत्व,त्या बनवण्याच्या पद्धतीविषयी मार्गदर्शन झाले.
याप्रसंगी सकस पोषण आहारा अंतर्गत खाद्य पदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका आर. आर.पेजे,
बीट प्रमुख चेतना वेले
सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.