राजापूर प. स. सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव अनेक इच्छुक पुरूष उमेदवारांचा हिरमोड

राजापूर (प्रतिनिधी): मंगळवारी जाहिर झालेल्या तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आरक्षण पडल्याने राजापुरातील अनेक इच्छुक पुरूष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव झाल्याने आता तालुका पंचायत समितीवर महिला राज येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या आरक्षण सोडत प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसिलदार सर्वसाधारण मीनल दळवी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रथम माहिती दिली. त्यानंतर आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
राजापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठीचे आरक्षण हे नागरिकांचा मागासवर्ग महिला राखीव झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक पुरूष उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.