नोकरीला लागला अन् गाडी घेऊन पळाला; रत्नागिरीतील धक्कादायक घटना

रत्नागिरी ः प्रतिनिधी
ट्रान्सपोर्टच्या इनोव्हा गाडीवरील चालकानेच गाडी घेउन पोबारा केल्याची घटना रविवार 12 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7.30 वा.कालावधीत आठवडा बाजार येथील स्वामी ट्रान्सपोर्ट दुकानासमोर घडली आहे.
निसार अब्दुल सतार चौगुले (रा.अन्सारी चौक कोकणनगर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात स्वामी ट्रान्सपोर्टचे मालक आदित्य संदेश निकम (22,रा.पेठकिल्ला,रत्नागिरी) यांनी मंगळवार 14 एप्रिल रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा स्वामी ट्रान्सपोर्टच्या इनोव्हा गाडी (एमएच-08-एएल-1955) वरी चालक म्हणून कामाला होता. रविवारी सकाळी त्याने ट्रान्सपोर्टची ही गाडी फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरुन नेली. दरम्यान, चालक गाडीसह गायब असल्याचे लक्षात येताच आदित्यचे वडिल संदेश गुरुनाथ निकम हे गाडीचा रत्नागिरीच्या आजुबाजुला शोध घेत होते. परंतु गाडी कोठेही मिळून न आल्याने अखेर मंगळवारी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.