गौरव पोंक्षे माखजन
सशक्त भारताचे स्वप्न साकार करायचं असेल तर आजच्या विद्यार्थ्यांनी सात्विक आहाराकडे वळावे असे मत कीर्तनकार सचिनबुवा साठे यांनी व्यक्त केले.ते जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा माखजन मराठी येथे कीर्तनात बोलत होते.माखजन मराठी शाळेत शारदोत्सवात कीर्तनकार सचिनबुवा साठे यांचे नारदीय कीर्तन ठेवण्यात आले होते.
ते कीर्तनात म्हणाले की,आज विद्यार्थी जंक फूड च्या आहारी गेला आहे.यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी सतत समस्या उद्भवत आहेत.याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले.भारतीय संस्कृती मध्ये आहाराविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहे.काय खावं?केव्हा खावं?किती वेळा खावं?हे सांगितलेले आहे.आयुर्वेदात् देखील हेच पाहायला मिळत.पण आज विद्यार्थी नेमक उलट करताना दिसत आहेत.यात बदल व्हयला हवे असे नमूद केले.समर्थानी ८९ व्या श्लोकात भोजन करताना कस कराव याच यथार्थ वर्णन केल आहे.याविषयी सचिन बुवा साठे यांनी अनेक दाखले देत विद्यार्थ्यांना व पालकांना पटवून दिले. निरुपणावेळी त्यांनी विद्यार्थी व पालक वर्गाला त्यांनी मार्गदर्शन करताना अध्यात्मातील विचार आचरणात आणून, संपन्न जीवन कस कराव याविषयीं मार्गदर्शन केले.
कीर्तनाच्या मध्यंतरात विद्यालयातील कु कस्तुरी जगन्नाथ जड्यार हिने ‘माय भवानी तुझे लेकरू’ ही गीत सादर केले.व वाहवा मिळवली.
दरम्यान शारदोत्सवानिमित्त विविध गटात भोंडला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.यामध्ये लहान गट प्रथम कस्तुरी जड्यार,द्वितीय सक्षम चाळके,तृतीय ऋषभ सागवेकर
मध्यम गटात प्रथम आर्या जोगले,द्वितीय श्रावणी खोपे,तृतीय आरोही हेमण
मोठा गट प्रथम आरोही कांबळे, द्वितीय साक्षी पाटील,तृतीय आदित्य मोरे यांनी क्रमांक मिळवले. भोंडला स्पर्धेचे परीक्षण सौ विनया पेंडसे यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ नांदीवडेकर , शिक्षक श्री घाणेकर सर, श्री मितेश पळे,सौ सुप्रिया जाधव,व्यवस्थापन अध्यक्षार सौ शामल सागवेकर आणि पालक वर्ग उपस्थित होता.









