शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र

सुकळवाड मतदारसंघ उपविभागप्रमुख पदी उमेश गावडे

तिरवडे शिवसेना गावप्रमुख पदी विकास गावडे

तिरवडे शिवसेना उपशाखा प्रमुखपदी आप्पा गावडे, अनिल गावडे यांची नियुक्ती

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी काही नव्या नियुक्त्या जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केल्या आहेत. दरम्यान नवनियुक्त पदाधिकारी यांना दत्ता सामंत यांनी नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहीर करण्यात आलेल्या नियुक्ती मध्ये सुकळवाड उपविभागप्रमुख पदी उमेश गावडे, तिरवडे शिवसेना गावप्रमुख पदी विकास गावडे, तिरवडे शिवसेना उपशाखा प्रमुखपदी आप्पा गावडे, अनिल गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ही आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. शुभेच्छांसह ! जय हिंद ! जय महाराष्ट्र ! असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

यावेळी तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख मिहीर राणे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड यांसह यांसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती होती. यात माजी जिप सभापती संतोष साटविलकर, माजी उपसभापती छोटू ठाकुर, मसुरे उपसरपंच पिंट्या गांवकर, मकरंद राणे, मंदार लुडबे, बबन परब, संदीप भोजणे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.