वेंगुर्ले : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याअंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर, तुळस येथे नमो नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. गावातील एकूण ९८ जणांची नेत्र तपासणी यावेळी करण्यात आली.
यावेळी वेंगुर्ला भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, तुळस सरपंच सौ. रश्मी परब, उपसरपंच श्री. सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्री. जयवंत तुळसकर, बुथ अध्यक्ष श्री. पिंट्या राऊळ, बूथ अध्यक्ष श्री. प्रमोद गोळम, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. वैभव होडावडेकर, रामचंद्र परब, आशाताई आदी मान्यवर उपस्थित होते.
नेत्र चिकित्सक डॉ. तेली, डॉ.गद्रे यांचे प्रतिनिधी श्री. उदय दाभोलकर आणि त्यांच्या चमू द्वारे तुळस गावातील एकूण ९८ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. लोकांचा प्रतिसाद एवढा होता की शेवटी रुग्ण थांबवावे लागले नोंदणी झालेल्या रुग्णांची तपासणी होई पर्यंत रात्री ८.३० वाजले. तरीही सर्व रुग्णांनी मोदीजींना धन्यवाद दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार तुळस माजी सरपंच श्री. विजय रेडकर यांनी मानले.













