मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या नेतृत्वात रोजगाराचा उत्सव!

शब्दा पलिकडे कृतीची साक्ष!

सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे 

राज्यात १०३०९ अनुकंप व अन्य भरती पूर्ण.

सिंधुदुर्ग नगरी l प्रतिनिधी :“शब्दा पलिकडे कृती म्हणून ख्याती, सामान्य जनतेसाठी दूरदृष्टी असणारे लोकनेते” व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुळे अनुकंप भरती व लोकसेवा आयोमार्फत एकूण १०३०९ कर्मचारी भरती राज्यात आज झाली. सिंधुदुर्गात अनुकंपाची २५ व लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदावर ८१ पदावरती पात्र उमेदवारांना महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी म्हणून नियुक्ती पत्रे देण्यात आली. महाराष्ट्रातील जनता हा ऐतिहासिक कार्यक्रम कायम लक्षात ठेवेल! असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

दृकश्राव्य प्रणाली द्वारे मुबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा मुख्य कार्यक्रम व सिंधुदुर्ग सह प्रत्येक जिल्ह्यात हा शनिवारी झाला. उपमुख्य मंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, मंत्री आशिष शेलार मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग नगरीत झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी अधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम सर्वांसाठीच प्रेरणा देणारा ऐतिहासिक ठरला!

अनुकंपा अंतर्गत नोकऱ्यांचे वाटप हे राज्य सरकारच्या जनतेप्रती संवेदनशीलतेचे प्रतीक

*पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

*राज्यातील प्रत्येक तरुणाला रोजगार देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

*सिंधुदुर्गनागरी येथे झाला नियुक्ती पत्रे वितरणाचा कार्यक्रम.

 

महाराष्ट्रातील कोणताही तरुण रोजगार मिळावा, प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार आहे,” असे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. ते सिंधुदुर्गात झालेल्या अनुकंपा अंतर्गत नोकरी नियुक्ती पत्राचे वाटप कार्यक्रमात बोलत होते. मंत्री नितेश राणे म्हणाले, ” महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीत अग्रस्थानी असून युवकांसाठी रोजगार निर्मिती हीच सरकारची प्राथमिकता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे नेतृत्व हे जनतेच्या हितासाठी कार्य करणारे आहे. असेही ते म्हणाले.

ओरोस

“माझ्या महाराष्ट्रातील कोणताही तरुण बेरोजगार राहू नये, प्रत्येकाच्या दोन हातांना काम मिळाले पाहिजे, ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृतीतून सिद्ध करत आहेत,” असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

ते अनुकंपा अंतर्गत नोकऱ्यांच्या वाटप कार्यक्रमात बोलत होते. राणे म्हणाले की, राज्यातील असंख्य पात्र उमेदवारांना नोकऱ्या देऊन सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. हा कार्यक्रम फक्त रोजगाराचा नव्हे, तर राज्य सरकारच्या जनतेवरील प्रेम आणि जबाबदारीचे प्रतीक आहे.

“मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीच्या बाबतीत देशात अग्रस्थानी आहे. यामुळे राज्यातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होत आहे,” असे राणे यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, “महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. आज नोकरी मिळालेल्या सर्व युवकांनी प्रशासनाचा भाग म्हणून राज्यसेवा हीच एकमेव भावना मनात ठेवून काम करावे.”

राज्यातील उद्योगपती आणि गुंतवणूकदार आता महाराष्ट्राकडे विश्वासाने पाहत आहेत, ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचेही पालकमंत्री राणे यांनी सांगितले.

“सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या रोजगार वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.