शेळपी रस्त्यावर दुचाकीचा अपघात : परुळे गवाणवाडी येथील प्रशांत दाभोलकर याचा जागीच मृत्यू

परुळे l प्रतिनिधी  :परुळे गवाणवाडी येथील रहिवासी कु.प्रशांत गुरुनाथ दाभोलकर ( वय वर्ष ३२) याचा मध्यरात्री शेळपी रस्त्यावर दुचाकीवरून पडून जाग्यावरच अपघाती मृत्यू झाला.

प्रशांत हा आपल्याच दुचाकीवरून जात असताना रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे त्याची दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या निस दगडाला आदळली. या अपघातात तो दुचाकीवरून खाली पडला असता त्याच्या डोक्याला मोठा मार बसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक एवढी जबरदस्त होती की रस्त्याचा निस निखळून पडला आणि गाडी रस्त्याच्या बाजूला पडली.

प्रशांत यांच्या अपघाती मृत्यू मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तो प्रचंड मेहनती असा मुलगा होता. त्यांच्या पाश्चात् आई, वडील, बहीण, काका, काकी, भाऊं असा परिवार आहे. या प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आधिक तपास पोलिस करीत आहेत.