मित्रपरिवाराकडून शोक व्यक्त—
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी –– फोंडा गावातील वरवडेकरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संभाजी राजाराम राणे (७९ वर्षे) यांचे वृद्धापकाळातील गंभीर आजारामध्ये मुंबई निवासी दुःखद निधन झाले. गेले काही वर्षे ते आजारपणामुळे उपचार घेत होते. वयाची सावली लांब होताना सुद्धा, त्यांचा उत्साह सर्वांना लाजवणारा आणि ऊर्जा देणारा होता. सरळ साधा स्वभाव, निगर्वी परंतु निग्रही व्यक्तिमत्व, निस्वार्थी, द्वेष – असूया यांचा लवलेश ही नाही. त्यामुळे ते जेथे जात, तेथे सर्वांशी मैत्री करीत. फोंडाघाट मधील वास्तव्यात, त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. विनोदी बुद्धी, हजरजबाबीपणा आणि वकिलीचा अभ्यास केलेला असल्यामुळे, बेशिस्त आणि नेतृत्वहीनते कडे जाणाऱ्या समाजाबद्दल त्यांना भयंकर संताप होता. मात्र खंत बोलताना प्रकृती अस्वास्थ्यपुढे ते हतबल होत. फोंडा हायस्कूलचे ते ज्येष्ठ माजी विद्यार्थी असल्याने, आणि त्या प्रतिकूल परिस्थितीत शाळेच्या विकासात्मक कार्यात त्यांचे योगदान, सर्वांसाठी मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्याने मैत्रीच्या तारांगणातील तारा निखळल्याची खंत त्यांच्या मित्र परिवारातून व्यक्त करण्यात येत आहे …
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल फोंडाघाट पंचक्रोशी आणि मुंबई येथील त्यांच्या मित्र परिवारात दुःख व्यक्त होत आहे….












