युवती अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या गोव्यात आवळल्या मुसक्या

सावंतवाडी पोलिसांची कारवाई : दुसऱ्यावरही गुन्हा दाखल 

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील एका चिरेखाणीत काम करणाऱ्या १९ वर्षीय युवतीवर त्याच चिरेखाणीतील कामगाराने ३ ऑक्टोबरच्या रात्री अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या गुन्ह्यात मुख्य आरोपी फरार झाला होता. या मुख्य आरोपीच्या सावंतवाडी पोलिसांनी गोव्यातून रात्री उशिरा मुसक्या आवळल्या. तर सदर प्रकरणी पाळत ठेवून मदत करणाऱ्या दुसऱ्या कामगारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर युवतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही कामगारांवर बलात्कार आणि बलात्कारास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा मुख्य आरोपी थामस बा. (वय २१, रा. लसिया, झारखंड) याला रात्री उशिरा पोलिसांनी गोवा राज्यातून ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान या प्रकरणी

पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुळीक अधिक तपास करत आहेत.