वेंगुर्लेत पहिल्याच अवकाळी पावसात वीज वितरण कंपनी नापास…

दोन तास उलटले तरी वीज पुरवठा सुरळीत करण्यात अपयश..

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांचा लखलखाट एक तास मुसळधार पाऊस कोसळला. या दरम्यान शहरातील वीज बिल खंडित झाला असून दोन तास उलटून गेले तरी वीज वितरण कंपनी कडून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही.

पहिल्याच अवकाळी पावसात वीज वितरण कंपनी नापास झाली आहे. या पुढे तरी दुरुस्तीची कामे वेळीच करून पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.