जिल्हा परिषद शाळा क्र. २, कणकवली येथे वाइल्डलाईफ सेव्हियर्स NGO तर्फे सर्प जनजागृती कार्यक्रम
कणकवली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्र. २, कणकवली येथे वाइल्डलाईफ सेव्हियर्स या स्वयंसेवी संस्थेतर्फे सर्प जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी योग्य माहिती पोहोचवणे, सापांविषयी असलेली भीती व गैरसमज दूर करणे, तसेच साप चावल्यास घ्यावयाचे योग्य प्रथमोपचार पद्धती समजावून सांगणे असे होते. कार्यक्रम दरम्यान विद्यार्थ्यांना सापांचे पर्यावरणातील महत्त्व, सर्पांचे प्रकार आणि त्यांच्या ओळखीबाबत माहिती देण्यात आली. वन्यजीव संवर्धनाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात NGO चे सदस्य ओंकार सावंत, प्रतिक सावंत, ओम ढेकणे, चैतन्य वळंजु, प्रथमेश चौगुले, साहिल सावंत आणि युवराज सावंत यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.











