सिंगापूरमधील गुंतवणुकीच्या संधींवर मंत्रालयात आढावा बैठक
इंडिया मेरीटाईम वीक २०२५ संदर्भातही चर्चा
महाराष्ट्र जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण–२०२५ अंतर्गत सिंगापूरमधील गुंतवणुकीच्या संधी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला चालना आणि स्थानिक रोजगारनिर्मितीसाठी एंटरटेनमेंट सेंटर स्थापन करण्याच्या प्रस्तावावर आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ही बैठक सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाची ठरणार आहे. बंदर विकास,मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नामदार नितेश राणे यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक पार पडली. याबाबतची माहिती नामदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे दिली आहे
या बैठकीत सिंगापूरमधील विविध जहाजबांधणी आणि सागरी क्षेत्रातील कंपन्यांकडून राज्यात जहाजबांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या संधींबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मुंबईत होणाऱ्या इंडिया मेरीटाईम वीकबाबतही आढावा घेण्यात आला.
या बैठकीला एंटरप्राईज सिंगापूरचे प्रादेशिक संचालक (पश्चिम भारत) श्री. वॉंग वेई कांग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. प्रदीप तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ही माहिती बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.













