बांदा : प्रतिनिधी
वीज कंपनीने प्रस्तावित केलेले स्मार्ट मीटर बसवण्यास वाफोली ग्रामस्थांनी विरोध केला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत स्मार्ट मीटर न बसविण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. या ठरावाचे निवेदन बांदा कनिष्ठ अभियंता रघुनाथ ठाकूर यांना देण्यात आले.
यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, विष्णू गवस, मारुती गवस, चंद्रकांत आईर, हेमंत सामंत, नितीन सावंत, राजाराम परब, प्रदीप आयकर, धर्मेंद्र खानोलकर, आकाश सावंत, लक्ष्मण निगुडकर, शशिकांत घाडी, बाबू वराडकर आणि नारायण गवस यांचा समावेश होता.
स्मार्ट मीटर बसवल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि यामुळे वीज बिलात अनावश्यक वाढ होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाफोली गावात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू नका असे कनिष्ठ अभियंता ठाकूर यांना सुनावण्यात आले.












