आय.सी.एस. मध्ये भारतीय हवाई सेना दिन उत्साहात साजरा

खेड (प्रतिनिधी) – येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 8 ऑक्टोबर हा भारतीय सेना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शौर्य पराक्रम व अभिमानाचे प्रतीक असणाऱ्या भारतीय युवा सेने बद्दल यावेळी ऋण व्यक्त करण्यात आले. एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. सचिन सागर यांनी प्रास्ताविकात या दिनाचे महत्त्व विशद केले, तसेच कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले. या कार्यक्रमासाठी 19 महाराष्ट्र बटालियन कराडचे हवालदार श्री. कानिफनाथ काळे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांनी भारतीय जवान ज्या परिस्थितीत राहतात व आपली सेवा देतात ती परिस्थिती आपण प्रत्येकाने प्रत्यक्ष जवळून पाहिली पाहिजे व त्यांचे ऋण मान्य केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांनी या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत एन.सी.सी. विभागाच्या वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ. सचिन सागर यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. डी. एम. शिंदे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व छात्र उपस्थित होते.