खेड | प्रतिनिधी : सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था, तुर्भे नवी मुंबई या संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी जिल्हा परिषदेच्या कशेडी गावणकरवाडी या शाळेला एक संगणक संच भेट दिला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी आपल्या भाषणात कोकणातील विद्यार्थ्यांनी यू.पी.एस.सी व एम.पी.एस.सी या स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे असे आवाहन केले. तसेच त्यांनी या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांच्या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल असे सांगितले.
यावेळी कशेडी येथील श्री.स्वामी समर्थ मठाचे व्यवस्थापक श्री समीर मोरे, कशेडी गावणकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रभाकर कोळेकर,कशेडी लिटी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनिल पांगूळ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.गजानन मादगे, शिक्षणप्रेमी श्री.अजित गावणकर,पालक सौ.वर्षा मादगे व इयत्ता ७वीतील विद्यार्थी वेदांत गावणकर याने मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास कशेडी गावचे माजी सरपंच श्री सुरेंद्र दरेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री भास्कर दरेकर,श्री.प्रमोद खेडेकर,शिक्षक श्री. मंगेश चाळके, श्री. मनोहर पेंडखलकर,श्री.केशव नागरगोजे,पालक सौ हर्षदा खसासे,श्री.मंगेश मादगे,सौ जयश्री पवार,सौ प्रिती पवार,सौ.नंदा गावणकर,सौ.मयुरी गावणकर,श्री.राजाराम गावणकर, अंगणवाडी सेविका प्रमिला सावंत, मदतनीस सौ. संगीता पवार, विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर यांनी संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.










