नाडण विकास सोसायटीकडून मराठवाडा पुरग्रस्तांना मदत

मा. पालकमंत्री ना. नितेश राणे साहेब यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाडण विकास सोसायटीतर्फे मराठवाडा पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १०,००० रुपये आर्थिक मदत करण्यात आली आहे.

 

या वेळी सोसायटीचे चेअरमन श्री मकरंद यशवंत जोशी, व्हाईस चेअरमन संजय वारिक, संचालक मारुती उपरकर, संतोष बाईत, रविंद्र कानडे, शांताराम पुजारे, मधुकर घाडी, योगेश मिराशी, संध्या भडेकर, अर्चना मिराशी, विकास भाबल, रोहन कांबळे, योगेश घाडी तसेच सचिव संतोष वारिक यांनी पूरग्रस्तांबाबत सद्भावना व्यक्त केली.

 

स्वीकृत संचालक मिलिंद वारिक आणि अनुजा जोशी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत पुढील काळातही समाजोपयोगी कार्यात सहभाग ठेवण्याचे आश्वासन दिले.