Mental Health हा शब्द ऐकला की लोकांना एकच संकल्पना आठवते ती म्हणजे मानसिक आजार… वेड लागणं…वगैरे वगैरे…. पण सत्य परिस्थिती खूप वेगळीच आहे… आणि त्याबद्दल फारस कोणी बोलू पाहत नाही… पण अशी काही अडचण असणं यात लाजिरवाण काहीच नाही हे समजून घेणं खूप गरजेचं आहे…
आजच्या या धकाधकी च्या आयुष्यात माणूस फक्त घड्याळाच्या काट्यावर धावतोय….प्रत्येकाची प्रत्येकाला मागे टाकून पुढे जायची शर्यत चालू असते…. आणि आपण इतके धावतो…इतके धावतो की धावून दमल्यावर पाणी विचारणार पण कोणी नसत…मागे वळून पाहिलं की लक्षात येत आपलेपणा मागेच राहिला की…..
या धावपळीत सगळेच विसरलो की आपण काटे नाही माणूस आहोत…
खरं सांगू का आपल्याला कोणालाही शर्यती नंतरचा एकटेपणा नकोय तर कदाचित हातात हात धरून साखळी धाव हवीय….सगळी धावपळ आयुष्याची तजवीज करण्यासाठीच असते त्यात गैर काहीच नाहीये… पण आयुष्य जगायचं विसरून जातोय आपण…
थकलात तर थांबा… दुखावलात तर आराम करा….रडू आल तर हक्काच्या खांद्याचा आधार घ्या… It’s Okay for not being Okay….
तणाव हा आज माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे… लहान मुलांना अभ्यासाचा…परीक्षांचा ताण…तरुणांना नोकरीचा…लग्नाचा….सासूला सुनेचा…सुनेला सासूचा…. हे आणि असे कितीतरी …..
पण खरंच हे सगळे विषय इतके कठीण आहेत की आपण त्यांना कठीण बनवतोय…..मुळात हे समजायला हवं की प्रत्येक अडचणी वर मात नाही करता येत किंवा तसा हट्ट ही नसावा…काही अडचणींना सावरून सांभाळून tackle करत पुढे जावं लागत आणि या प्रवासात साथ देतो तो संवाद….
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असावी जिच्याशी आपण निखळ संवाद साधू शकतो, कुठल्याही judgment ची भीती न बाळगता!
कुठलंही नात असो किंवा कुठलीही परिस्थिती वर संवादाने उत्तर मिळत आणि जिथे उत्तर नाही मिळत तीथे मनावरचं ओझ हलकं होत…
जसं ओंजळ भरली की त्यातली वस्तू वाट मिळेल तशी वाहणारच तसं मनाची ओंजळ विचारांनी भरली की मग ते वाट मिळेल तसे वाहत जातात आणि त्या विचारांच्या पुरात अख्खा देह वाहून जात ज्याला आपण depression किंवा Anxiety सुद्धा म्हणतो … म्हणून म्हणते विचारांची ओंजळ इतकी ही भरून देऊ नका की तिचा बेफाम प्रवाह रोखताच येणार नाही…..नको असलेल्या विचारांचा गाळ साचून च देऊ नका…वेळीच निचरा करून टाका त्याचा…बोला….संवाद साधा…
कदाचित तुमचं सगळ छान सुंदर सुरळीत सुरू असेल पण तुमच्या जवळची एखादी व्यक्ती या अनभिज्ञ प्रवाहात अडकली असू शकते…त्या व्यक्तीला एका आधार देणाऱ्या हाताची गरज असू शकते ती ओळखून तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा किंवा तुमच्या त्या व्यक्तीच मन ऐका ….बोलत करा…त्याला ही हलक वाटेल….
हीच ती वेळ असते जिथे आपण Mental Health सावरू शकतो. विचारांच्या चक्रव्युहात अडकण्या पासून कोणाला वाचवता आलं तर नक्की त्याला मदत करा…. फक्त एक दिवस या साठी राखीव न ठेवता सातत्याने सर्वांना मदत करूया!!!!!
सौ. चारुता केदार इंदुलकर
BHTMS,MBA HR,
PG Diploma in COUNSELING PSYCHOLOGY
Speciality- Affirmations and Manifestation and Anxiety Dealing












