खासदार नारायण राणे साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शिफारशी नुसार निधी मंजूर
भाजपा पेंडूर जिल्हा परिषद प्रभारी सतीश वाईरकर यांनी व्यक्त केले आभार
मालवण | प्रतिनिधी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पेंडूर जिप विभागामध्ये जिल्हा नियोजन विविध हेड अंतर्गत पहिल्या टप्प्यात 1 कोटी 57 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. आमचे नेते खासदार नारायणराव राणे साहेब भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शिफारसीनुसार हा निधी मंजूर झाला. पालकमंत्री नितेश राणे साहेब, खासदार नारायण राणे साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे
भाजपा पेंडूर जिल्हा परिषद प्रभारी सतीश वाईरकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
जिल्हा नियोजन सन २०२५ / २०२६ जि. प. पेंडूर विभागात प्राप्त निधी
जनसुविधा अंतर्गत कट्टा खालची गुरामवाडी रस्ता ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे ६ लाख, पेंडूर परबवाडी ते ओमनकडे जाणारा रस्ता की.मी. ०/१५० ते ०/५५० खडीकरण डांबरीकरण करणे १५ लाख, तळगाव मुख्य रस्ता ते श्री देव रामेश्वर मंदिर ते श्री देव रवळनाथ मंदिरकडे जाणारा खडीकरण डांबरीकरण करणे १२ लाख, ग्रामपंचायत धामापूर कार्यक्षेत्रातील मोगरणे फोपळेवाडी सुरेश फोपळे यांच्या घरालगत पायवाट तयार करणे ४ लाख, ग्रामपंचायत गुरामनगरी कुंभारवाडी ते वरची गुरामवाडी कडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख, ग्रामपंचायत गुरामनगरी वाईरकरवाडी तेलीवाडी स्मशानभूमी सुशोभीकरण करणे ४ लाख.
ग्रामीण मार्ग अंतर्गत साळेल कुळकरवाडी ग्रा. मा. ३९९ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, ग्रा.मा.३८८ काळसे बागवाडी रस्ता गुरुनाथ पवार यांच्या घरापासून रामकृष्ण खोत घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ७ लाख, ग्रा.मा.३८९ गुरामवाड खरारे पेंडूर मोगरणे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ७ लाख.
अंगणवाडी अंतर्गत ग्रामपंचायत तळगाव देऊळवाडी अंगणवाडी छप्पर दुरुस्ती करणे १.५ लाख,
ग्रामपंचायत आंबेरी वाक अंगणवाडी छप्पर दुरुस्ती करणे १.५ लाख, पेंडूर सोनारवाडी अंगणवाडी दुरुस्त करणे ३ लाख,
ल.पा. बंधारे अंतर्गत ग्रामपंचायत साळेल कुळकर वाडी नं १ करडाचा कोंड येथे बंधारा बांधणे १४ लाख.
एमएसईबी अंतर्गत ग्रामपंचायत खरारे पेंडूर खांदवाडी येथील विद्युत पोल शिफ्ट करणे २.५ लाख, ग्रामपंचायत गुरामनगरी नांदोस गुरामनगरी हद्दीवरील नांदोस फिडर भोजने ए वाय सीट च्या पुढे पोल शिफ्टिंग करणे २.५ लाख, तळगाव खांदवाडी सातेरी मंदिर ट्रान्सफॉर्मर बसविणे १० लाख.
नागरी सुविधा अंतर्गत पेंडूर गावातील खरारेवाडीतील सावरी पासून मुरलीधर सावंत यांच्या घरासमोरील रस्ता तयार करणे १० लाख, ग्रामपंचायत खरारे पेंडूर खांदवाडी येथील मुख्यरस्त्यास बंदिस्त गटार तयार करणे. २.५ लाख, ग्रामपंचायत खरारे पेंडूर मुगचीवाडी ते गोसावीवाडी कडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख, ग्रामपंचायत खरारे पेंडूर मोगरणे बोराळवाडी येथे गणेश घाट दुरुस्ती करणे २.५ लाख, ग्रामपंचायत खरारे पेंडूर सोनारवाडी ब्राम्हणदेव मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे. ५ लाख, ग्रामपंचायत खरारे पेंडूर अपधारणा टेकडी ते नळपाणी योजना विहिरीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ग्रामपंचायत खरारे पेंडूर बोराळवाडी वाडवळी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे ३ लाख.
क वर्ग अंतर्गत ग्रामपंचायत गुरामनगरी कार्यक्षेत्रातील लिंगेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे ६ लाख.
शाळा दुरुस्ती अंतर्गत ग्रामपंचायत काळसे बागवाडी शाळा कंपाऊंड वॉल बांधणे ७ लाख, ग्रामपंचायत आंबेरी मळा शाळा छप्पर दुरुस्त करणे ३ लाख.
कोल्हापुरी बंधारे : पेंडूर परबवाडी येथे बंधारा बांधणे५ लाख. असा एकूण १ कोटी ५७ लाख निधी मंजूर झाला आहे.













