सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर तर्फे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिन वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार
दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक १० वाजता ग्रंथालयाच्या “रमाकांत सुर्याजी खानोलकर” सभागृहात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि मा. श्री. अमोलजी चव्हाण, पोलिस निरिक्षक, सावंतवाडी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले आहेत.
ग्रंथालयाने सन २०२४-२५ या वर्ष भरात आजीव, साधारण, तसेच बाल गटातून वाचक सभासदांनी वाचन केलेल्या ग्रंथांची दखल घेऊन ग्रंथालयाने उत्कृष्ट वाचक सन्मान २०२५ यासाठी वाचक सभासदांची निवड केलेली आहे. त्यांचा यथोचित सन्मान सदर कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
तरी ग्रंथप्रेंमी, वाचनप्रेंमी, हितचिंतक यांनी कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थिती राहावे, असे आवाहन वाचन मंदिरच्या वतीने करण्यात येत आहे.












