वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद कोदे 

तर सचिवपदी अण्णा म्हापसेकर यांची बिनविरोध निवड

सावंतवाडी । प्रतिनिधी:वैश्यवाडा येथील श्री काडसिद्धेश्वर महाराज मठात वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी दोन वर्षांसाठी बिनविरोध निवडण्यात आली आहे. दिनांक १२ ऑक्टोबर रोजी वैश्यवाड्यातील नागरिकांच्या झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदी प्रसाद कोदे, तर सचिवपदी अण्णा म्हापसेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या बैठकीत मावळते अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात वैश्यवाड्यातील सर्व नागरिकांचे व सदस्यांचे चांगले सहकार्य मिळाल्यामुळे चांगले काम करता आले, असे सांगून त्यांनी नवीन कमिटीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मंदिर समितीचे विश्वस्त म्हणून विकास सुकी हे काम पाहणार आहेत.

या बैठकीत निवडण्यात आलेली नवीन कार्यकारीणी पुढीलप्रमाणे आहे:

अध्यक्ष: प्रसाद कोदे

उपाध्यक्ष: मिलिंद सुकी

सचिव: अण्णा म्हापसेकर

सहसचिव: संकेत शिरसाट

खजिनदार: संजय म्हापसेकर

सहखजिनदार: महेश म्हापसेकर

सदस्य: प्रथमेश टोपले, रुपेश कुडतरकर, ओंकार कोदे, केतन कालेलकर, गजानन सुकी, अक्षय म्हापसेकर, प्रथमेश सुकी, सौं. गीता सुकी, सौं. अस्मिता नेवगी.

सल्लागार मंडळात सौं. विद्या सुकी, दीपक म्हापसेकर, आनंद नेवगी आणि सतीश नार्वेकर यांचा समावेश आहे.

यावेळी वैश्यवाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले. नूतन कार्यकारिणी पुढील दोन वर्षांसाठी मंदिराचे उत्सव आणि धार्मिक कार्यांचे नियोजन करणार आहे.